."गव्हर्नन्स‘ किंवा कार्यपद्धतीतील सुधारणांवर सरकारने जसा भर दिला, त्याविषयी जशी चर्चा केली, त्या तुलनेत आर्थिक क्षेत्रातील मूलभूत धोरणात्मक सुधारणा आणि त्याआधारे पुनर्रचना हा विषय सध्या तरी कोपऱ्यात ढकलला गेल्याचे जाणवते. काही अर्थतज्ज्ञ फक्त त्याविषयी खंत व्यक्त करीत असले, तरी एकूण राजकीय चर्चाविश्वाचा तो भाग झाला नाही, हे वास्तव नाकारता येण्यासारखे नाही. या परिस्थितीत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मुंबईत ललित दोशी स्मृती व्याख्यानात बोलताना देशातील सरकाराश्रित भांडवलशाहीवर (क्रॉनी कॅपिटॅलिझम) केलेली टीका डोळ्यांत अंजन घालणारी आणि सुधारणांची दिशा स्पष्ट करणारी आहे. राजन यांनी नेमक्या वर्मावर बोट ठेवले आहे. आपण सरकारप्रणीत समाजवादाकडून आता सरकाराश्रित भांडवलशाही चालवत आहोत आणि त्यामुळे फक्त मूठभरांचेच उखळ पांढरे होत आहे. हे चित्र बदलून विकासाचा पंथ धरायचा असेल तर खरीखुरी निकोप स्पर्धा, उद्योजकतेला वाव, समान संधी यांची गरज आहे, अशा शब्दांत राजन यांनी सध्याच्या स्थितीवर बोट ठेवले. ..........
........
No comments:
Post a Comment